४ लाखात विकत होते बाळ... पोलीसांनी सापळा रचत केली अटक!

Update: 2021-11-02 11:54 GMT

नवी मुंबई येथे लहान बाळाची चार लाखात विक्री करणारा डॉक्टर आणि चार महिलांना कामोठे पोलिसांनी सापळा रचत मोठया शिताफीने अटक केले आहे. अटक केलेल्या आरोपी डॉक्टरचा कामोठ्यात स्वतःचा दवाखाना आहे. अशी माहिती कामोठे पोलिसांनी दिली. पंकज पाटील असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. पंकज पाटील यांनी मुलगी असलेल्या बाळाचा अवघ्या ४ लाखात सौदा करून बाळाची विक्री केली होती. सध्या हा डॉक्टर आणि त्याच्या ४ महिला साथीदार कामोठे पोलिसांच्या ताब्यात आहेत.


असा रचला पोलिसांनी सापळा...


कामोठे सेक्टर ८ मधील फॅमेली हेल्थ केअर नावाने दवाखाना चालवणारा डॉक्टर एका लहान बाळाची ४ लाखाला विक्री करणार असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्यात मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांनी डॉक्टरला अटक करण्यासाठी सापळा रचला.


ठरल्यानुसार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक मंथन पाटील आणि खाजगी पंच या बाळाची खरेदी करण्यासाठी डॉक्टर पंकज पाटील यांच्या दवाखान्यात गेले. त्या वेळी डॉक्टर पाटील यांनी सांगितलेली ४ लाखाची रक्कम देखील सोबत घेऊन गेले. पैसे दाखवून त्यांनी बाळाची विचारणा केली. त्यावेळी डॉक्टर ने पैसे पाहून बाळ विकणार्याख महिलेला फोन केला आणि दवाखान्यात येण्यास सांगितले. तळोजा येथे राहणार्याा चार महिला मुलगी असलेल्या लहान बाळाला घेऊन आल्या. ठरलेल्या व्यवहारानुसार डॉ. पंकज पाटील यांनी पैसे घेतले आणि बाळ ग्राहक बनलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस नाईक मंथन पाटील बाळाला घेऊन सुखरूप बाहेर पडले. यानंतर लगेच सापळा रचलेल्या कामोठे पोलीसांच्या महिला पथकाने या महिलांना व डॉक्टरला अटक केली.

Tags:    

Similar News