भाजपने निलंबित केलेल्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ नेटकऱ्यांनी राबवली ट्विटर वर मोहिम........

Update: 2022-06-07 06:13 GMT

 भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विषयी लाईव्ह चर्चेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यामुळे झालेल्या वादंगांमुळे भाजपने नुपूर शर्माला निलंबित केलं पण आता त्याच नुपूर शर्माच्या समर्थनार्थ नेटकऱ्यांकडून ट्विटरवर मोहिम राबवण्यात आली आहे.




 


भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे. तर वादग्रस्त वक्तव्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवरून भारताने माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेत बोलताना मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. याबरोबरच अरब देशांनीही नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. कतार, कुवैत, इराण, युएई, जॉर्डन, ओमान, सौदी अरेबिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बहरीन, इंडोनेशिया, मालदिव या देशांनी भारताविरोधात नाराजी व्यक्त करावी. त्यानंतर भाजपने नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले.

परंतू भारतात ट्विटरवर याचे विपरीत पडसाद उमटताना पाहायला मिळतायत. #नुपूरशर्माकोवापसलो, #नुपूर शर्मा असे हॅशटॅग्ज ट्रेंडींगमध्ये आहेत. संजू सिंह या वापरकर्त्याने ट्विट करत नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. तो म्हणतोय की, " नुपूर शर्मा एखाद्या धर्माबद्दल जे म्हणाल्या आहेत त्यावर माझा पुर्ण विश्वास आहे कारण नुपूर शर्मा जे काही म्हणाल्या आहेत ते १०० टक्के सत्य आहे आणि सत्य नेहमी कटू असतं. माझा नुपूर शर्मा यांना पाठिंबा आहे."

तर अजित कुमार दुबे या वापरकर्त्य़ाने ट्विट करत, "या महिलेने इस्लामिक पुस्तकात बंदिस्त सत्य उघड करून पेडोफिलियाचा सराव करणार्यार राक्षसांच्या संपूर्ण रक्तपिपासू, उद्धट, असहिष्णू भावना भडकवल्या आहेत. तिला सुरक्षेची आणि पाठिंब्याची नितांत गरज आहे. कोणताही दहशतवादी तिला इजा करू शकत नाही, अन्यथा त्यांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल." असं म्हटलं आहे.

तर अमित कुमार य़ा वारकर्त्याने नुपूर शर्मा यांना त्यांते पाच लाख फॉलोअर्स पुर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. " ५ लाख अनुसारक पुर्ण केल्या बद्दल अभिनंदन नपूर शर्मा मॅडम! तुम्ही आणखी मजबूत होणार आहात. माझा आपल्याला पुर्ण पाठींबा आहे."

असे ट्विट्, पाहिल्यानंतर आपण आणखी किती धर्मांदतेकडे वळणार आहोत हा प्रश्न नक्की पडतो. नुपूर शर्मा यांनी जे वक्तव्य केलं त्या विरोधात त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई देखील केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची यामुळे नाचक्की झाली.

Tags:    

Similar News