'महापौर साहेब पालिकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच इमारत गळत होती' - रुपाली चाकणकर

Update: 2020-10-17 04:56 GMT

परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात मात्र सत्तेच्या यशापयशावरून राजकारण सुरू झाले. यातील महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आरोपांना राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे.

चाकणकर यांनी "पुणे महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात आहे, पुणे "स्मार्ट सिटी" योजनेसाठी केंद्र सरकारने निवडलेले शहर आहे याची माहिती कदाचीत महापौरांना नसावी.पुण्याचे कर्तव्यदक्ष खासदार भाजपाचे आहेत,शहरातील बहुतांश आमदार भाजपाचे आहेत आणि स्वतः महापौर ही भाजपाचेच आहेत. तरीही कालच्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे असे त्यांना वाटते."

"मुरलीधर मोहोळ यांच्या माहितीसाठी एका गोष्टीची आठवण करुन द्यावी लागेल,महानगरपालिकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच इमारत गळत होती. त्यावरून लक्षात घ्यायला हवे की पुण्याची जबाबदारी आपल्याकडे असल्यानंतर काय होणार आहे. एका पावसाने पुण्याला नदीचे स्वरुप येत असेल तर "स्मार्ट सिटी" योजनेत नक्की काय केले गेले हे एकदा तपासून घ्यायलाच हवे." अशी प्रतिक्रीया दिली आहे.

दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी "पुणे महापालिकेत सलग पंधरा वर्ष सुळे यांच्या पक्षाची म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. याची आठवण करून देत मोहोळांनी खासदार सुळेंचा आरोप खोडून काढला. कात्रज, धनकवडीसारख्या भागांत नेहमीच राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले. त्यांनी काहीच कामे केली नाहीत का?" असा प्रश्न उपस्थित केला होता.


Tags:    

Similar News