नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगरे वर्मा यांना 'मास्टर ऑफ सायन्स' ही पदवी प्रदान!

Update: 2021-12-03 13:53 GMT

नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगरे वर्मा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी मधून मास्टर ऑफ सायन्स इन सिटीज ही पदवी पुर्ण केली. ही पदवी मिळवण्यासाठी त्यांना प्रतिष्ठीत ब्लूमबर्ग शिष्यवृत्ती मिळाली होती. याची माहिती त्यांनी ट्विटरवर ट्विट करून दिली.  

त्या म्हणाल्या,"लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून मला 'मास्टर ऑफ सायन्स इन सिटीज' ही पदवी प्रदान करण्यात आली आहे हे सांगताना आनंद आणि आनंद होत आहे. जगभरातील मध्यम करिअर व्यावसायिकांसाठी या कार्यकारी अभ्यासक्रमासाठी प्रतिष्ठित ब्लूमबर्ग शिष्यवृत्ती मिळवण्याचे भाग्य मला लाभले."

कोण आहेत प्राजक्ता लवंगरे वर्मा?

सध्या त्या नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त असून त्यांनी २००१ साली त्या IAS झाल्या होत्या. याआधी त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं सिल्हाधिकारी पद सांभाळलं आहे. निभागीय आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी नवी मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनामध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे.

Tags:    

Similar News