मुंबईत आता वाहनांना कलर कोड... बाहेर पडताना सावधान

Update: 2021-04-18 02:48 GMT

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिले जाणार असल्याची माहिती त्यांच्या फेसबूक वरून दिली आहे. सध्या मुंबईत लॉकडाऊन सुरु असतानाही लोक घराबाहेर पडत आहेत. लोकांचीही गर्दी टाळण्यासाठी हेमंत नगराळे यांनी आता लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या सुविधाधारकांच्या गाडीला कलर कोड राहणार असल्याचं सांगितलं आहे. हेमंत नगराळे यांनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन मधून सूट देण्यात आलेल्या व्यक्तीला 6 इंचाचं गोलाकार स्टिकर असेल. गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर हे स्टिकर लावण्यात येतील.

कोणत्या सेवेसाठी कोणता रंग…

लाल रंग: वैद्यकीय क्षेत्र यांच्या गाड्यांसाठी लाल रंग

हिरवा रंग: भाजीपाला, किराणा, फळं आणि डेअरीच्या गाडीसाठी हिरवा रंग

पिवळा रंग: अत्यावश्यक सेवेसाठी


Tags:    

Similar News