मिस्टर अँड मिसेस बोंडादे यांच नृत्यकलेतून भिमाला अभिवादन

अमेरिकेत ऑनलाईन जयंती साजरी करताना मिस्टर अँड मिसेस बोंडादे यांनी भीमाच्या गाण्यावर ठेका धरत आपल्या नृत्यकलेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. पाहा हा व्हिडिओ

Update: 2021-04-18 03:38 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली. यंदाची जयंती करोनामुळे सार्वजनिकरित्या साजरी करता आली नाही मात्र ही विचारांची, कलागुणांची विशेष जयंती म्हणून साजरी करण्यात आली आहे.

भारतातचं नव्हेतर सातासमुद्रापार असलेल्या आंबेडकर अनुयायींनी आपल्या कलेतून भीमजयंती साजरी केली. अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ. स्वाती बोंडादे आणि डॉ. शैलेश बोंडादे हे भारतीय असून मूळचे महाराष्ट्रातील नागपूर येथील आहे. अमेरिकेत ते दक्षिण कॅलिफोर्निया येथील सैनफ्रांसिस्को येथे सध्या राहतात.

अमेरिकेत ऑनलाईन जयंती साजरी करताना मिस्टर अँड मिसेस बोंडादे यांनी भीमाच्या गाण्यावर ठेका धरत आपल्या नृत्यकलेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे.

पाहा मिस्टर अँड मिसेस बोंडादे यांचा हा व्हिडिओ...

Full View

Similar News