'माझी तळतळाट आहे की,एखांद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या करावी'

Update: 2021-07-04 08:49 GMT

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील स्वप्नील लोणकर नावाच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नीलच्या आत्महत्येच्या बातमी नंतर MPSC करणाऱ्या विध्यार्थांमध्ये खळबळ उडाली आहे. तर स्वप्नीलच्या आत्महत्यासाठी सरकार आणि राजकरणी जवाबदार असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून स्वप्निल लोणकर हा तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने तणावाखाली होता. स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत आपल्या वडिलांना आपण अधिकारी झाल्यानंतर सुखाची भाकर मिळेल असा विचार करणाऱ्या स्वप्निलला एवढे कष्ट करुनही नोकरी मिळाली नाही.त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलेले.

तर स्वप्नीलच्या आत्महत्यासाठी सरकार आणि राजकरणी जवाबदार असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. 'माझी तळतळाट आहे की,एखांद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या करावी' , तेव्हा त्यांना मुलाच्या जाण्याचा दुखः कळेल असं म्हणत, स्वप्नीलच्या आईने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

Full View

Tags:    

Similar News