बस..,हीच गाडी तुमचं स्वप्न पूर्ण करणार?

Update: 2023-04-23 01:45 GMT

Morris Garages Motor India (MG Motor India) ने इलेक्ट्रिक कार कॉमेट EV चे अनावरण केले आहे. ब्रिटिश कार निर्माता कंपनीची ही सर्वात स्वस्त, लहान आणि एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार आहे. गुजरातमधील हलोल प्लांटमध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले आहे. ही कार टाटा मोटर्सच्या Tiago EV शी स्पर्धा करेल.

MG ZS EV नंतर MG ची ही दुसरी EV असेल. कंपनीने 2 मार्च रोजी आगामी स्मार्ट इलेक्ट्रिक कारच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासून, कंपनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे कारबद्दल सतत अपडेट देत आहे.

कंपनीने कारचे इंटीरियर आणि डॅशबोर्ड आणि सीट अपहोल्स्ट्री टीझरमध्ये दाखवली आहे. या कारची पहिली झलक बुधवारी दिल्लीतील गुडगाव येथे एका कार्यक्रमात पाहायला मिळाली.

बाहेरून गाडी कशी दिसणार?

एमजीने 2023 एमजी टॉलबॉय डिझाइन देण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक छोटी 2 डोअर कार आहे, ज्यात समोर एलईडी हेडलॅम्प, MG लोगो, डेटाइम रनिंग लॅम्प, मागील बाजूस एलईडी टेल लाइट्स, 12-इंच स्टील व्हील, बाजूला व्हील कव्हर्स, क्रोम डोअर हँडल, पुढील आणि मागील पार्किंग कॅमेरे आहेत. .

MG Comet EV ला 5 रंग पर्याय मिळतील, ज्यात कँडी व्हाइट, ऍपल ग्रीन विथ ब्लॅक रूफ, कँडी व्हाइट विथ ब्लॅक रूफ, अरोरा सिल्व्हर आणि स्टाररी ब्लॅक यांचा समावेश आहे.

Tags:    

Similar News