'ब्रेक द बायस' मॅरेथॉन स्पर्धेत 50 हजारांहून अधिक महिला सहभागी..

ब्रेक द बायस, रन फोर इक्वलिटी, महिला सुरक्षा, रस्त्यावर होणारे अपघात आशा अनेक गोष्टींची जनजागृती करण्यासाठी आयोजित ब्रेक द बायस' मॅरेथॉन स्पर्धेत 50 हजारांहून अधिक महिला सहभागी..

Update: 2022-03-14 04:02 GMT

'ब्रेक द बायस' या उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भेदभाव सोडा हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास पन्नास हजारांहून अधिक महिला या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या.



महिला सुरक्षेला महत्त्व द्या, रस्ते अपघात टाळा, रस्ता सुरक्षा महत्त्वाची असे अनेक संदेशपर फलक हातात घेऊन महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या. ब्रेक द बायस, रन फोर इक्वलिटी, त्याचसोबत रस्त्यांवर वाढणारे अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी सीट बेल्ट, हेल्मेटचे महत्व, वाहन चालवत असताना वेगावर नियंत्रण असे महत्वाचे संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.




 या महिला मॅरेथॉनचे आयोजन पाच किलोमीटर, तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर अशा वेगवेगळ्या प्रकारात करण्यात आले होते. स्पर्धेची सुरुवात कस्तुरचंद पार्क मैदानातून करण्यात आली. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे आणि नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमल यांनी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या मॅरेथॉनच्या माध्यमातून अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिलांना अशा क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची संधी मिळाली.

Tags:    

Similar News