"महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर महाराष्ट्र माफ करणार नाही", यशोमती ठाकूर यांचा इशारा

Update: 2022-02-28 09:44 GMT

 रविवार पासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यभरातून कोश्यारींवर आता टीका होतेय. मंत्री यशोमती ठाकूर यांनीदेखील राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर टीका केलीये.

रविवारी एका कार्यक्रमातील आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. आपल्या भाषणात त्यांनी समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा? असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका होतेय. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील त्यांच्यावर ट्विट करत टिका केलीये. त्या म्हणाल्या, "वयाच्या आणि अधिकाराच्या या टप्प्यावर एखाद्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसावा हे न पटण्यासारखं आहे.जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास पसरवण्याचा उद्योग संघ परिवार अनेक वर्षे करत आला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर महाराष्ट्र माफ करणार नाही.",

Tags:    

Similar News