"भिडे गुरुजीं सारख्यांना.." मेधा पाटकर संतापल्या..

Update: 2022-05-06 09:27 GMT

सध्या राज्यात भोग्यांचे नाही तर भोंगळा राजकारण सुरु असल्याची टिका जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्यां मेधा पाटकरांनी केली आहे. अस्मितेचे प्रश्न उठवायचे आणि अस्तित्वाचे प्रश्न नाकारायचे अस सध्याच्या राजकारणाचे स्वरुप झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका धर्माच्या मतांचे गठ्ठे मिळवण्यासाठी हि सर्व उठाठेव असुन यातुन एकाच धर्माला लक्ष करण्याचा हा सारा प्रकार अमानवीय असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेश सारख्या राज्यात हिंदु मंदीरांमधुन भल्या पहाटे आरती आणि पुजापाठ होतंच असल्याचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भोंगे प्रकरणावर महाविकास आघाडीच्या सरकारने कोणालाही न घाबरता सक्त कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

भिमा कोरगाव प्रकरणात निरपराध कार्यकर्त्यांनाच गोवल्या गेले असुन ज्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले अशांनाच जेलमध्ये ठेवल्या गेल्याचा आरोप सामाजीक कार्यकत्या मेधा पाटकरांनी केला आहे. अशातच भिडे गुरुजीं सारख्यांना या प्रकरणातुन सुट मिळणे हे गंभीर असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान वाचवायचा असेल तर अशा प्रकारच्या उद्योगाला राजकीय खतपाणी घातले गेले नाही पाहिजे याची दक्षता घ्यावसास हवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News