व्हिडीओ: सुरक्षा भिंतीवरुन खाली वाकून पाहण्याची हौस महिलेला पडली महागात

Update: 2021-07-12 16:11 GMT

मुंबईच्या गेट वे आँफ इंडिया इथे एक महिला समुद्रात पडल्याची घटना घडली. वरुन वाकून समुद्र पाहत असताना त्या महिलेचा तोल गेला आणि ती समुद्रात पडली. त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती. पण गेट वे ऑफ इंडियावर फोटोग्राफीचे काम करणाऱ्या गुलाबचंद गोंड यांनी जीवाची परवा न करता थेट समुद्रात उडी मारली आणि त्या महिलेला वाचवले.

गोंड यांचे वय ५० वर्षे आहे. यावेळी तिथे उपस्थित पोलीस आणि नागरिकांनी दोरी आणि ट्यूबच्या सहाय्याने या दोघांना समुद्रातून बाहेर येण्यास मदत केली.

Full View
Tags:    

Similar News