Afghanista: मुलं-मुलींना एकत्र शिक्षण घेण्यासाठी अखेर बंदी

Update: 2021-08-30 12:17 GMT

taliban announce ban on coeducation in afghanistan: अफगाणिस्तानमध्ये ( afghanistan ) तालिबानची ( taliban ) सत्ता लागू झाल्यानंतर अनेक बदल दिसू लागले आहेत. उच्च शिक्षा मंत्रालयाचे कार्यवाहक मंत्री अब्दुल बकी हक्कानी यांनी एक फतवा जारी केला आहे. आता शाळेमध्ये मुलांचे आणि मुलींचे वेगळे वर्ग असतील. मुल-मुली एकत्र वर्गात नाही बसणार. लवकरच नवीन सरकार शाळेमध्ये मुला-मुलींच्या बसण्यासाठी वेगळ्या वर्गाची व्यवस्था करणार आहे.

महिला शिक्षणासाठी पोषक वातावरण राहील: तालिबान

सरकारी आणि खासगी शाळेच्या अधिकाऱ्यांशी बातचीत करताना हक्कानी यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानमध्ये मुलींना शिक्षणाचा अधिकार दिलं जाईल. परंतु त्या मुलांसोबत बसून शिक्षण नाही घेणार. आमच्या सरकारअंतर्गत महिलांना सुरक्षित शिक्षणाचं वातावरण उपलब्ध करून दिलं जाईल. लवकरच नवीन विद्यापीठ बनवणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे.

1990मध्ये महिलांच्या शिक्षणावर घातली बंदी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या शासन काळापासून महिलांवर होणारे अत्याचार समोर येऊ लागले. १९९० मध्ये जेव्हा तालिबानची सत्ता होती. त्यावेळी मुलींच्या शिक्षणावर पूर्णपणे बंदी (Complete ban on girls education ) होती. परंतु आता नव्यानं तालिबानची सत्ता आल्यानं जरी तालिबानी महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार दाखवत असले तरी काही दिवसांपासून समोर येणाऱ्या घटनानंतर या घोषणेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags:    

Similar News