कोण आहे ट्विटरची नवी CEO ?तिचं नाव का चर्चेत ?

Update: 2023-05-12 08:41 GMT


 गेली अनेक दिवस ट्विटर इतर सोशल मीडिया साईट पेक्षा जास्त चर्चेत आहे. कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे ट्विटर चर्चेत होते .नेहमी होणाऱ्या बदलांमुळे ट्वीटरचे सीईओ इलोन मस्क चर्चेत आहेत . त्याचबरोबर ट्विटर वरील ब्युटी काढण्याच्या निर्णयामुळे सुद्धा पुन्हा एकदा ट्विटरच ट्विटरवर ट्रेंडिंग होतं.

ट्विटर स्वतः एक सोशल मीडिया साईट आहे . इलॉन मास्क यांनी मागील वर्षी त्यांनी ट्विटरची खरेदी केली होती. त्यानंतर ट्विटर मध्ये अनेक बदल आपण पाहिले आणि यापुढेही अनेक बदल होतील अशी शक्यता सुद्धा दरवेळी इलॉन मस्क देताना आपल्याला दिसत असतात .पण यावेळी CEO पदाचा राजीनामा देत नवीन सीईओ कोण असेल याबद्दल त्यांनी कल्पना दिली आहे. पण नाव सांगितले नाही .पण पुढील महिलेचे नाव मात्र चर्चेत आहे .

ट्विटर ची नवीन सीईओ कोण असेल ? याबाबतीत खालील ट्विट त्यांनी केले आहे

Linda yaccarino आहे तरी कोण?

1. तिच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, Yaccarino 2011 पासून NBC युनिव्हर्सलमध्ये आहे. तिची सध्याची भूमिका चेअरपर्सन, जागतिक जाहिरात आणि भागीदारी म्हणून वर्णन केलेली आहे.

2. याकारिनोने टर्नर येथे 19 वर्षे सेवा केली होती. जिथे तिची Executive Vice President/COO Advertising Sales, Marketing and Acquisitions.

अशी शेवटची भूमिका होती .

3. ती पेन स्टेट युनिव्हर्सिटीची माजी विद्यार्थी आहे, तिने लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशन्सचा अभ्यास केला आहे.

४. काही प्रसिद्ध अहवालानुसार आपल्यला कळते कि ,Yaccarino ने भूतकाळात तिच्या मित्रांना सांगितले होते की तिला ट्विटरची सीईओ व्हायचे आहे.

त्यामुळे एलोन मास्कचा ट्विट मधील "She" हीच असेल का ? हे पाहावं लागणार आहे . तुम्हला काय वाटतं ? प्रतिसाद नक्की कळवा .

Tags:    

Similar News