सोनाली प्रल्हाद मदने, गेली ४.५ वर्ष पीआर आणि स्ट्रॅटेजी विभागात काम करत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे त्यांचंही उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा होती. सहा वर्षांच्या परिश्रमानंतर आज दक्षिण कोरियातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या महिला विद्यापीठात ज्याचे नाव "इव्हा वुमन्स युनिव्हर्सिटी" 이화여자대학교 Ewha Womans University आहे त्यांच्या इंटरनॅशनल बिझनेस च्या मास्टर्स प्रोग्रॅमसाठी सोनाली निवड झाली आहे. स्कॉलरशिप साठीची स्पर्धा मोठी होती म्हणून त्यांना कोरियातील स्कॉलरशिप मिळाली नाही पण कामाच्या उत्तम अनुभवामुळे त्यांना विद्यापीठात प्रवेश मिळाला. विद्यापीठाच्या Fall 2022 या टर्म साठी भारतातून ६ महिलांची तर महाराष्ट्रातून एकट्या सोनालीची निवड झालेली आहे. सोनाली या मध्यमवर्गीय कुटुंब आणि मागासवर्गीय समाजातून येतात. उच्च शिक्षणासाठी त्यांच्या परिवाराकडे पैसे नाहीत पण शिक्षणाचे महत्व मात्र त्यांना ठाऊक आहे.
एक विवाहित महिलेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आजही मर्यदितचं आहे. जेव्हा शिकण्यासाठी देशाबाहेर जायचं हे जेव्हा सोनालीने ठरवलं तेव्हा त्यांचे पती निलेश बुधावले फक्त त्यांचा एकट्याचा पाठिंबा त्यांना होता. पण हळूहळू गोष्टी स्थिरावत गेल्या. त्यांच्या कुटुंबातील किंबहुना समाजातील पहिली विवाहित महिला आहे जिने इतका मोठा निर्णय घेण्याचे धाडस केले आहे. पण येथे ही आर्थिक गणितं कोलमडतात.
शैक्षणिक कर्जासाठी त्यांनी तब्बल ८ बँकांचे दरवाजे ठोठावले पण बँकेत "कोलॅटरल" ठेवण्यासाठी काही नसल्याने हाती निराशा आली. यावरही त्यांनी तोडगा काढत शेवटचा क्राऊड फंडिंग चा मार्ग आत्मसात केला आहे.
मिलाप आणि व्यतिगत पातळीवर सध्या क्राऊड फंडिंगच काम सुरू आहे. येत्या २० जुलै च्या आत २० लाख जमा करायचे आहेत.
सोनालीची शिक्षणासाठी चाललेली धडपड पाहून त्यांच्या मदतीला अनेक हात उभे राहिलेत. खूप लोकांनी त्यांचे कौतुक केले. केवळ पैसे नाहीत म्हणून खूप मुलींनी शिकण्याची ईच्छा त्यांनी मारून टाकली पण सोनालीच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे खूप जणींना नव्याने शिक्षण घेण्याची ताकद मिळाली. आणि याच कारणामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील तब्बल ४ लाखांची मदत सोनालीला बहाल केलीय, पण तरीही त्यांना अजून बराच टप्पा गाठायचा आहे.
आपल्या थोड्याशा सहकार्याने कदाचित सोनाली आपले स्वप्न साकार करेल. त्यामुळे शक्य तितकी मदत करूया.
#helpsonali
To donate : https://milaap.org/fundraisers/support-sonali-pralhad-madane/deeplink?deeplink_type=upi&utm_medium=whatsapp_message&utm_source=app