कोरोनातही सर्वसामान्यांना झटका!; एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

Update: 2021-07-01 08:03 GMT

मुंबई: आधीच महागाईने जनता होरपळून निघाली असताना, सर्वसामन्यांना सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरमागे तब्बल 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली असून, कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 84 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

आज 1 जुलैपासून नव्या किमती लागू झाल्या असून, जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत 809 रुपयांना मिळणार घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर आता 834.50 रुपयांना घ्यावा लागणार आहे.

आधीच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून जाणारा सर्वसामान्य व्यक्ती हतबल झाला आहे. असं असतानाही पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल आणि गॅसच्या किमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Tags:    

Similar News