कीर्तनकाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; तृप्ती देसाई यांची कारवाईची मागणी..

बाळकृष्ण महाराज मोगल यांचा एका स्त्री कीर्तनकारासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या कीर्तनकारावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Update: 2022-04-10 11:59 GMT

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाळकृष्ण महाराज मोगल यांचा एका स्त्री कीर्तनकारासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गृहमंत्र्यांना लेखी तक्रार देत या किर्तीनकारावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील 40 वर्षीय महिला किर्तनकार या दोघांचा शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे अनेक ठिकाणी बोलले जात आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाची ही चित्रफीत त्यानेच बनवल्याचं दिसत आहे. 2 मिनिटे 45 सेकंदाच्या या चित्रफिती दोघेही ठळकपणे दिसत आहेत. ही चित्रफित गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे

या सगळ्या प्रकारावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या कीर्तनकारावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जे कीर्तनकार उपदेश देतात, समाजप्रबोधन करतात तेचं जर असे विकृत वागायला लागले तर त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठीच गृहमंत्र्यांना आज मी लेखी तक्रार दिली असल्याचं त्यानी सांगितलं आहे.

या सर्व प्रकारावरून तृप्ती देसाई यांनी काय म्हटले आहे?

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाळकृष्ण महाराज मोगल हा प्रसिद्ध कीर्तनकार आहे. त्यांचा एका महिला कीर्तनकारासोबतचा संभोग करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता, दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आतील नैसर्गिक क्रियेचा व्हिडिओ चित्रित करून तो व्हायरल करणं हा कायद्याने गुन्हा आहे. जे कीर्तनकार उपदेश देतात, समाजप्रबोधन करतात तेचं जर असे विकृत वागायला लागले तर त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठीच गृहमंत्र्यांना आज मी लेखी तक्रार केले आहे. या कीर्तनकारावर तातडीने गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. यातून वारकरी संप्रदायाला गालबोट लागत आहे. कीर्तनकारांची बरीच बदनामी यामुळे होत आहे. म्हणूनच वारकरी महामंडळ व संघटनांनी सुद्धा या कीर्तनकारावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कीर्तन करण्याची बंदी घातली पाहिजे. त्यांची ह.भ. प. भागवताचार्य ही पदवी देखील काढून घेतली पाहिजे. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल होणे गरजेचे आल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हंटल आहे.

Full View

Tags:    

Similar News