बच्चेकंपनीसाठी आनंदाची बातमी! आता आई बाबांप्रमाणेच पॅनकार्ड बनवता येणार!

Update: 2021-11-18 05:08 GMT

बँकेच्या कामांसाठी, सरकारी योजनांसाठी PAN CARD असणं अत्यावश्यक आहे. PAN CARD आतापर्यंत फक्त वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींनाच मिळत होतं. पण आपल्याला ठाऊक आहे का की, आपण आपल्या मुलांच्या पॅन कार्डसाठी देखील अर्ज करू शकता.

बँकेचं खातं उघडणं, डीमॅट खातं उघडणं, कर्ज घेणं, मालमत्ता खरेदी करणं, बाँड्समध्ये इन्व्हेस्ट करणं याशिवाय सरकारने देऊ केलेल्या इतर आर्थिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. PAN CARD हा वैध ओळख पुरावा म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वीकारला जातो. जर एखाद्या इन्व्हेस्टमेंट मध्ये नॉमिनी म्हणून मुलांचा समावेश करायचा असेल, मुलांच्या नावावर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर आपण Kids PAN CARDसाठी अर्ज करु शकता.

एखादी व्यक्ती १८ वर्षे पूर्ण झाल्यावर पॅन कार्ड बनवते, आणि आपलं बँक खातं देखील उघडते. परंतु आता १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीही पॅन कार्ड ची सुविधा सुरू झाली आहे. पण यासाठी फक्त मुलाचे पालक त्यांच्या मुलांच्या वतीने पण कार्डसाठी अर्ज करू शकतात.

असा कराल। Kids PAN CARD साठी अर्ज

- नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

- आवश्यक तपशील भरा.

- 'Kids PAN CARD' ही श्रेणी निवडा.

- १०७ रुपये पॅन कार्ड नोंदणी शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पालकच त्यांच्या मुलांच्या पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. अर्ज भरल्यानंतर आपल्याला एक पावती क्रमांक मिळेल. पॅन कार्ड आपण दिलेल्या पत्त्यावर १५ दिवसांच्या आत पोहोचेल.

अल्पवयीन मुलांच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. अल्पवयीन व्यक्तीचे पालक ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र सबमिट करू शकतात.

Tags:    

Similar News