करुणा शर्मां यांच्या कोठडीत आणखीन दोन दिवस वाढ...

5 सप्टेंबरला अटक झाली होती. जातिवाचक शिविगाळ आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

Update: 2021-09-18 07:37 GMT

प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या, करुणा शर्मा यांचा पुन्हा दोन दिवसाचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सोमवारी 20 सप्टेंबरला जामीनावरील पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. न्या . सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे.

शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती . त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून फिर्यादी विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीवरून, करुणा शर्मासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर परळी शहर पोलीस ठाण्यात, गु.र.न 142-2021 कलम 307,323,504,506,34,3 (1)(r),3(1),3(2) सह ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला होता.

परळी पोलिसांनी करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती . तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती . त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती . आज न्या . सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली . शर्मा यांची ऍड.भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकारच्या वतिने अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. दरम्यान दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले .

Full View

Tags:    

Similar News