कोण आहेत 'कदंबिनी गांगुली' ज्यांच्यासाठी गुगलने डूडल बनविले

Update: 2021-07-18 08:44 GMT

देशातील पहिल्या महिला डॉक्टर कादंबरी गांगुली (Kadambini Ganguly) यांच्या 160 व्या जन्मतिथीच्या निमित्ताने गुगलने त्यांचे चित्र डूडलवर ठेवला आहे. 1884 साली कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला होत्या. तसेच कदंबिनी गांगुली (Kadambini Ganguly) ह्या पहिल्या दक्षिण महिला होत्या ज्यांनी युरोपियन औषध प्रशिक्षण घेतले होते.

ज्या काळात एखाद्या महिलेने वैद्यकीय शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेणं म्हणजे दुर्मिळ होतं, त्यावेळी कदंबिनी यांनी वैद्यकीय घेत समाजसेवा केली. तसेच पहिल्या पदवीधर महिला म्हणून सुद्धा कदंबिनी यांना ओळखले जाते. तसेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात बोलणारी पहिली महिला म्हणून सुद्धा कदंबिनी यांची ओळख आहे.

18 जुलाई 1861  रोजी बिहारच्या भागलपुर मध्ये जन्म झालेल्या कादंबरी यांची आज 160 व्या जन्मतिथी आहे. कादंबरी गांगुली (Kadambini Ganguly) यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटवला होता. त्यांच्या याचा कार्याच्या दखल घेत, गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.

Tags:    

Similar News