एक परिक्षा आणि १०० महिला दाखल होणार भारतीय सैन्यात!

भारतीय सैन्यात जायचं १०० महिलांचं स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर…

Update: 2021-01-16 10:01 GMT

देशाच्या सुरक्षेत जितका पुरूष सैनिकांचा वाटा आहे. तितकाच महिला सैनिकांचा देखील आहे. भारतीय सैन्यात दाखल होऊन देशाचं संरक्षण करायचं स्वप्न अनेकांचं असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याच्या बीड, सातारा, सांगली कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधून ९० तर गुजरात मधून १० महिला पुण्यात दाखल झाल्या आहेत.

या सर्व महिलांनी पुण्यातील हडपसर येथे भारतीय सैन्याच्या दक्षिण कमानच्या विभागीय भरतीत शारिरीक प्रशिक्षण केंद्रात मैदानी परिक्षा उत्तीर्ण केली आहे. ही परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्या आता फेब्रुवारीमध्ये भारतीय सैन्य दलाच्या सेवेत रूजू होणार आहेत. पण त्या आधी या सर्व महिलांना लेखी परिक्षेला सामोरे जावं लागणार आहे.

मैदानी परिक्षेत भारतीय सैन्याकडून निवडण्यात आलेल्या या १०० महिलांपैकी बहुतांश महिला या क्रिडा क्षेत्रातल्या आहेत. या परिक्षेसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून १००० महिलांना निवडण्यात आलं होतं. मात्र ३५० महिलांनींच प्रत्यक्ष परिक्षेत सहभाग घेतला. या ३५० महिलांमधून सैन्य भरती अधिकाऱ्यांनी १०० महिलांना निवडले आहे.

या १०० महिला भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राची मान देशात उंचावली जाणार आहेच. पण भारताच्या प्रतिस्पर्धी देशांनाही भारतीय सैन्य मजबूत आणि स्त्री शक्तीने सदन असल्याचा संदेश जाणार आहे.

Tags:    

Similar News