पॅरालिंपिक स्पर्धेत 23 सुवर्ण पदके जिकणारी जेसिका लाँग..

आपल्या अपंगत्वावर मात करत तिने केलेला हा संघर्षमय प्रवास कसा होता वाचा...

Update: 2021-08-25 11:21 GMT

टोकियो या ठिकाणी आत्ताच ऑलम्पिक स्पर्धा पार पडल्या. आणि त्यानंतर आता टोकियो याच ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धेच्या दर्जा इतकच स्थान असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेची सुरुवात झाली आहे. काल अत्यंत दिमाखात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या स्पर्धेत भारताचे 54 खेळाडू 9 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. या सगळ्या स्पर्धेच्या दरम्यान एक नाव सध्या चर्चेत आहे. ते नाव आहे अमेरिकेच्या जेसिका लाँग यांचे. जेसिका लाँग या अमेरिकन Paralympics जलतरणपटू आहेत. सगळ्यात पहिला पॅरालिंपिक मध्ये त्या 2004 मध्ये सहभागी झाल्या व त्यानंतर त्यांनी आजपर्यंत अनेक पदकांची कमाई केली. आजपर्यंत जागतिक स्पर्धेत त्यांनी 52 सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यातील 23 पदके तिने पॅरालिंपिक स्पर्धेत मिळवली आहेत. या 23 पदकांपैकी 13 सुवर्ण आहेत.

कसा होता जेसिका लाँगचा आतापर्यंतचा प्रवास?

2004 मध्ये अथेन्समध्ये या ठिकाणी झालेल्या Paralympics स्पर्धेत त्या सर्वप्रथम सहभागी झाल्या व त्या वर्षी त्यांनी 400m freestyle, 100m freestyle आणि 4×100m freesty या वेगवेगळ्या प्रकारात तीन सुवर्णपदके जिंकली होती. त्यानंतर चार वर्षांनंतर बीजिंग या ठिकणी झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने एकूण सहा पदके जिंकली.

लाँगचे यानंतरचे पॅरालिम्पिक जे लंडन याठिकाणी झाले त्यात Jessica Long यांनी आणखीन प्रभावी कामगिरी केली. यावेळी तिने पाच सुवर्ण, दोन रौप्य, आणि एक कांस्य पदक जिकले. त्यानंतर तिने 2016 च्या रिओ गेम्समध्ये भाग घेतला तिथे देखील पदकांची कमाई केली. अशा या Jessica Long यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत आजपर्यंतचा हा प्रवास केला आहे. आता चालू असणाऱ्या स्पर्धेत ती किती पदके जिंकते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News