आमदाराला रेल्वेत अंडरवेअरमध्ये फिरण्यास विरोध केल्याने दिली गोळी मारण्याची धमकी

Update: 2021-09-03 04:19 GMT

आपल्या विविध कारनाम्यांमुळे चर्चेत राहणारे बिहारच्या सत्ताधारी जनता दल युनायटेडचे ​​(जेडीयू) आमदार गोपाल मंडल आता एका नव्या वादात अडकले आहेत. यावेळी गोपाळ मंडल यांनी पाटणाहून दिल्लीला जाताना असे काही कृत्य केले की ज्यामुळे रेल्वेत गोंधळ उडाला, वेळप्रसंगी रेल्वे पोलिसांना पाचारण करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा-दिल्ली तेजस रेल्वेने प्रवास करणारे आमदार गोपाल मंडल यांच्यावर एका प्रवाशाने अंडरवेअरमध्ये ट्रेनच्या बोगीत फिरण्याचा आरोप लावला आहे. तसेच विरोध केल्याने मारहाण करत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा सुद्धा आरोप सहप्रवाशांनी केला आहे.

यावर आमदारांचे मित्र कुणाल सिंह यांनी खुलासा केला आहे की, आमदार मंडल यांचे वजन जास्त आहे, त्यामुळे ते पूर्ण कपडे घालून वॉशरूममध्ये जाऊ शकत नाहीत. ते लुंगीमध्ये वॉशरूम मध्ये जातात. आज ट्रेनमध्ये चढताच त्यांना वॉशरूमला जायचे होते. मात्र ते घाईघाईने अंडरवेअरमध्ये निघून गेले, ज्यावर एक प्रवासी उद्धटपणे बोलला. त्यावेळी आमदार काही बोलले नाहीत पण आल्यानंतर त्यांच्याशी बोलले. त्यामुळे ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत, तसे काहीही झाले नाही, कुणाल सिंह म्हणाले आहे. आज तकने याबाबत हे वृत्त दिले आहे.

Tags:    

Similar News