१६ लाख रुपयांची टू-व्हीलर कशी असते पाहिलात का?

Update: 2023-05-04 01:57 GMT

इटालियन दुचाकी निर्माता कंपनी डुकाटीने मंगळवारी (2 मे) भारतात 'डुकाटी मॉन्स्टर एसपी' चे अपडेटेड मॉडेल लॉन्च केले. कंपनीने ही बाईक 15.95 लाख रुपये किमतीत लॉन्च केली आहे. होय जवळपास १६ लाखांची टू-व्हीलर.. आवाक होऊ नका ही बाईक नक्की कशी आहे? दिसते कशी? अशा अनेक गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा...

नवीन मॉन्स्टर एसपी बाइकचा लूक त्याच्या स्टँडर्ड मॉडेलसारखाच आहे. BS6 फेज 2 च्या नियमांनुसार या बाइकमध्ये अपडेटेड 973cc इंजिन जोडण्यात आले आहे. तसेच, यात 4.3-इंचाचा TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Ducati Monster SP ला LED DRL सह प्रोजेक्टर-शैलीतील हेडलॅम्प, इंधन टाकीवर फ्रंट इंडिकेटर मिळतील. तसेच, बाइकला लाल रंगात स्टेप-अप सीट आणि बाजूला बसवलेले ट्विन-पॉड एक्झॉस्ट मिळते. बाइकमध्ये लाल आणि काळ्या रंगाची ड्युअल टोन पेंट स्कीम देण्यात आली आहे.

Tags:    

Similar News