देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदासाठी तयारी आहे का?

Update: 2022-06-23 15:02 GMT

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना आवाहन करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. बंडखोर आमदारांनी २४ तासात महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी केली तर त्यांच्या मागणीवर विचार होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे. त्यानंतर सुद्धा शिंदे यांचे हे बंद संपेल अशी स्थिती नाही. त्यामुळे शिबसेनेच्या नेत्यांमध्ये आता आता काय होणार या प्रश्नाने घालमेल सुरू आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एक ट्विट करत भाजपचे हिंदुत्व सत्तेसाठी की महाराष्ट्र हितासाठी? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीसच्यावर आमदारांनी बंड केल्यानंतर सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले जाते आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४०पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन गुहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. या वेळी सर्व आमदार शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत आहेत. आम्हाला बाळासाहेबांनी बंधुत्वाची शिकवण दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी नैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा अशी भूमिका मांडली होती. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामागे भाजपचा हात असल्याचं बोलले जात आहे. याच मुद्यावरून दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का? भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी? भाजपाने या प्रश्नाचे उत्तर दिल्यास सर्व सत्य असत्य बाहेर येईल.

Tags:    

Similar News