५० कॉलेज व १०० स्टार्टअप्स सहभागी होणार एकाच एक्झिबिशनमध्ये

Update: 2022-09-17 11:43 GMT

 नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी शिक्षण क्षेत्र महत्त्वाचे आहे. भारतामध्ये उच्च शिक्षण संस्थांचे जगातील सर्वात मोठे आणि वेगाने वाढणारे नेटवर्क आहे. भारतातील 50% पेक्षा जास्त लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.त्यानुसार MSME DI आणि VSD कॉर्पोरेट इव्हेंट्स व झेप उदयोगीनी यांनी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे.

जागतिक व्यापार केंद्र मुंबई - World Trade Center येथे MSMES आणि START-UPS ला शैक्षणिक क्षेत्रातील व्यवसायाना प्रोत्साहन देण्यासाठी १८ ते २० सप्टेंबर दरम्यान हा उपक्रम पार पडणार आहे. या अनोख्या उपक्रमाला ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांचे सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठआणि इतर देशातील विद्यापीठेही सहभाग घेणार आहेत .महाराष्ट्रातील ५० कॉलेज व १०० स्टार्टअप्स एकाच एक्झिबिशनमध्ये सहभाग घेणार आहेत .या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची सुरुवात व उद्घाटन केंद्रीय लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे व महिला,बाल विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढायांच्या हस्ते झाली आहे.  .

K-12, व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासांसह भारतातील शिक्षण क्षेत्र MSMEs आणि स्टार्ट-अप्सना उत्पादने, सेवा आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत वाढीसाठी अनेक संधी प्रदान करतात. एमएसएमई आणि स्टार्ट-अप्सना शिक्षण क्षेत्रातील संस्था आणि सेवा प्रदात्यांशी जोडणे आणि त्याद्वारे वेगाने वाढणाऱ्या या क्षेत्रात वाढीच्या संधी उपलब्ध करून देणे हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. १८ सप्टेंबर रोजी अनेक उद्योजकांना MSME. च्या माध्यमातून अनेक सरकारी योजना त्यांचा लाभ आणि ऑनलाईन प्रोसेस याची पूर्णपणे माहिती देण्यात येणार आहे.त्यांना लागणारे फंडिंग आणि एक्सपोर्ट या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण या विषयावर तर 20 सप्टेंबर रोजी बिझनेस नेटवर्किंग मिटिंग व MSME फंडिंग विषयी माहिती देण्यात येणार आहे . त्याचबरोबर उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

इंटरनॅशनल एज्युकेशन एक्सपो 2022

• प्रदर्शन

• B2B परिषद

• निर्यात संधी

• स्टार्ट-अप फंडिंग

• आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा सहभाग

• विदेशी शिक्षणासाठी वित्तपुरवठा

• एमएसएमई शिक्षण पुरस्कार

• MSME चे शिक्षण क्षेत्र जर्नल पुस्तक 

Tags:    

Similar News