पुणे-मुंबई प्रवास होणार सुखकर...

Update: 2021-10-16 08:13 GMT

रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रवासातील थोडा जरी वेळ वाचला तर अनेक जण मोकळा श्वास सोडतात. आता मुंबईचा विचार केला तर ट्राफिक मुळे किती वेळ जातो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यात अनेक जण रोज पुणे - मुंबई अप-डाऊन करतात. आता विचार करा या प्रवासाचा यांना किती त्रास होत असेल. त्यात महिलांचे किती हाल होत असतील...हा विचार देखील करायला नको. पण कित्येक लोक का त्रास रोज सहन करतायत. पण आजची बातमी पुणे मुंबई असा रोज प्रवास करणाऱ्या लोकांचा आनंद द्विगुणित करणारी आहे. करण तुमचा आता पुणे-मुंबई प्रवास सुखकारक होणार आहे.

आज जर आपण पाहिलं तर वाहनांमुळे होणारे प्रदूषण वाहनांचा गोंगाट यामुळे सर्वच लोक त्रस्त आहेत. त्यामुळे प्रदूषण मुक्त प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात इ बसची मागणी आता वाढत आहेत. या सगळ्याचा विचार करून 'एव्हरी ट्रान्स लिमिटेड' या कंपनीने पुणे ते मुंबई दरम्यान पुरी बस या नावाने बस सेवा सुरू केली आहे. काल दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसच्या पुणे-मुंबई आशा नियमित फेऱ्या सुरू झाल्या आहेत. ही ई-बस असल्यामुळे ना वायू प्रदूषणाचा प्रश्न आहे ना , ध्वनी प्रदूषणाचा. ही बस एकदा चार्ज झाली तर त्यानंतर 350 किलोमीटरचे अंतर पार करू शकते.

या बस मध्ये काय काय फीचर्स असणार आहेत ते देखील पाहू..

या ई-बसची आसन क्षमता 45 इतकी आहे

अत्यंत आकर्षक पद्धतीने या बसची सजावट करण्यात आली आहे.

या बसमध्ये आरामदायक पुष बॅक सीट आहेत.

वाय-फाय ची सुद्धा सुविधा देण्यात आली आहे.

मनोरंजनासाठी बस मध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टीम आहे.

प्रत्यक्ष सीट जवळ एक यूएसबी चार्जर आहे.

5 क्यूब मीटर सामान भाऊ शकेल एवढी डिकी या बसला देण्यात आली आहे.

अशी ही अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली ही ई-बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांना आता पुणे-मुंबई हा आरामदायी प्रवास करता येईल. या बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागतील? तर याचे तिकीट सुद्धा फारसे महाग नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात आता आरामदाई प्रवास करता येणार आहे.

Tags:    

Similar News