INS Vagir महिला अधिकाऱ्यांना समुद्राखाली घेऊन गेलेली एकमेव पाणबुडी

Update: 2023-01-27 04:04 GMT

 भारतीय नौदलात INS वागीर ही अत्याधुनिक पाणबुडी 23 जानेवारीला दाखल झाली आहे. भारतीय नौदलाची पाचवी स्टेल्थ स्कॉर्पीन श्रेणीची ही पाणबुडी आहे. फ्रान्सच्या स्कॉर्पीन तंत्रज्ञानावर आधारित अशा सहा पाणबुड्या तयार आहेत.यातील चार पाणबुड्या कार्यरत आहेत आणि ही पाचवी INS वागीर हि पाणबुडी आहे. सर्व चाचण्यानंतर आता नौदलात सामील झाली आहे. हिची खासियत अशी आहे की कलवरी श्रेणीतील वागीर ही पाचवी स्टेल्थ आहे .


स्टेल्थ पाणबुडी म्हणजे काय ?

अशी पाणबुडी जी कुठल्याही रडार मध्ये टिपली जात नाही . त्याच पाणबुडीला स्टेल्थ पाणबुडी म्हणतात .

INS वागीर :काय आहे खासियत ?

INS वागीर ही या श्रेणीतील सर्वाधिक जलद तयार झालेली पाणबुडी आहे.आत्तापर्यंत पाणबुडी वर महिला अधिकारी तैनात करण्यात आल्या नव्हत्या . पण INS वागीर ही महिला अधिकाऱ्यांना समुद्राखाली घेऊन गेलेली एकमेव पाणबुडी ठरली आहे. 12 नोव्हेंबर 2020 रोजी जलावतरण झालं होतं . 1 फेब्रुवारी रोजी समुद्री चाचण्या झाल्या होत्या आणि 23 जानेवारी 2023 पासून INS वागीर नौदलात दाखल झाली आहे .

Tags:    

Similar News