तळागाळातील माणसांना हात द्या- सुनेत्रा पवार

विद्या प्रतिष्ठाण येथे साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्य दिनावर बोलतांना सुनेत्रा पवार म्हणाल्या...

Update: 2021-08-15 06:39 GMT

स्वातंत्र्यासाठी आपल्या मातृभूमीच्या पुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कुणी हसत फासावर गेले तर कुणी आपल्या छातीवर गोळी घेऊन आपला प्राण स्वातंत्र्यासाठी दिला. अशा सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. 75 वर्ष्यात आपण कृषी, व्यापार, तंत्रज्ञान आशा सर्वच क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान कामगिरी करून दाखवली आहे. विविधतेने नटलेल्या भारताने आजपर्यंत अनेक आव्हानांना सामोरे जात संपूर्ण जगापुढे एक वेगळे उदाहरण ठेवले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी म्हंटल आहे. आज त्याच्या हस्ते विद्या प्रतिष्टान बारामती येथे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

यापुढे बोलताना त्या म्हणाल्या, आज आपण ज्ञानाच्या कश्या रुंदावत तळागाळातील माणसांना शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा पोहोचवत महात्मा गांधींना अपेक्षित भारत उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजपर्यंतच्या वाटचालीत आपण अनेक गोष्टीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्याच्या या हिरक मोहोत्सवी वर्ष्यात पदार्पण करताना उर आनंदाने भरून येत आहे. पण मागील काही काळापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण व्यवस्थेवर खूप दूरगामी परिणाम झाले आहेत. आताच्या या नवीन शिक्षण पद्धतीत अनेक अडचणी येत असुन जवळपास 50 टक्के विद्यार्थी साधनांच्या अभावामुळे शिक्षण व्यवस्थेपासून दूर आहेत. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आता सर्वच शाखांचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने घेतला जात असून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे देखील म्हणाल्या. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थी व टोकियो ऑलम्पिक मध्ये विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन देखील केले.

Tags:    

Similar News