आत्मनिर्भर अॅप 'कु' ने कर्मचाऱ्यांवर आणली कुऱ्हाड..

Update: 2023-04-22 04:01 GMT

भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कु' ने एका वर्षात एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे 30% कर्मचारी कामावरून काढून टाकले. जागतिक मंदीमुळे कर्मचाऱ्यांची ही कपात झाली आहे. या संदर्भात कू ने म्हंटले आहे की, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भरपाई पॅकेज देण्यात आले आहे. याशिवाय, आरोग्य लाभ वाढवण्याबरोबरच नवीन नोकरी शोधण्यातही मदत केली आहे.

कंपनीने सांगितले की, त्यांनी जानेवारीमध्ये $10 दशलक्ष (सुमारे 82.15 कोटी) निधी उभारला आहे आणि त्याचे भांडवल चांगले आहे. कंपनी सध्या नवीन निधी उभारण्याचा विचारही करत नाही. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीने कमाईचे प्रयोगही सुरू केले. शाश्वत व्यवसाय निर्माण करण्यासाठी कमाईचा प्रयोग सुरू ठेवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कु ची स्थापना तीन वर्षांपूर्वी 2020 मध्ये झाली होती. ट्विटरची स्वदेशी आवृत्ती म्हणून ती ओळखली गेली. कू अॅपने ऑगस्ट 2020 मध्ये भारत सरकारचे आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंज जिंकले. तीन वर्षांत, कूने 60 दशलक्षाहून अधिक अॅप डाउनलोड केले गेले आहेत.

सह-संस्थापकांनी ट्विटरबाबत दु:ख व्यक्त केले होते..

कू अॅपचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी इलॉन मस्क यांनी ट्विटर कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकल्यावर दुःख व्यक्त केले. त्याचवेळी ट्विटरवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती..

Tags:    

Similar News