देशात कोरोना बाधितांची संख्या लाखापार....

Update: 2022-01-07 05:31 GMT

देशात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच संसर्गाचा आकडा १ लाख पार केला आहे. 24 तासांत संसर्गाचे 1 लाख 16 हजार 990 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 302 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत 85 हजार 958 इतकी वाढ झाली आहे. 31 डिसेंबर रोजी देशात 22 हजार 775 नवीन रुग्ण आढळले होते. या नंतर एका आठवड्यात देशात नवीन कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 5 पट वाढली आहेत. आतापर्यंत देशात 3.52 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी 3.43 कोटी लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 83 हजार 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ६५ हजार ४३९ झाली आहे.

Full View

Tags:    

Similar News