केंद्र सरकार नवनीत राणांना सुरक्षा देऊ शकते तर मग काश्मिरी पंडितांना का नाही? - डॅा. नीलम गोऱ्हे

Update: 2022-06-05 09:06 GMT

औरंगाबाद शहरात विधानपरिषद उपसभापती डॅा. नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, काही दिवसांपासून कश्मीर मधील कश्मीरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहे. केंद्र सरकारने हिंदू पंडितांसाठी पुकारलेली घरवापसी मोहीम पूर्णपणे फेल झाली आहे. एकीकडे नवनीत राणा व रवी राणा यांना झेड सुरक्षा दिली जाते. हीच सुरक्षा कश्मीर पंडितांना का देण्यात आली नाही? असा प्रश्न कपत त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे असं म्हटलं आहे.कश्मीर खोऱ्यांमध्ये आतंकवादी चळवळी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या हत्या करण्यात येत आहे. याची जबाबदारी केंद्र शासनाने स्वीकारावी आणि कश्मिरीपंडितांना झेड सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष निधीची तरतूद जिल्ह्यासाठी केले असून मोठ्या प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात आली आहेत. औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी मोठी पाणी पुरवठ्याची योजना आखली असून याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद शहराची पाणी पुरवठ्याची समस्या संपेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून यावरती मोठ्या प्रमाणात उपाय-योजना करण्याच्याही सूचना मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. औरंगाबाद शहरातील पर्यटनच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत असून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध देवस्थाने आणि पर्यटन स्थळाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी मोठा निधी औरंगाबाद जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.



Tags:    

Similar News