पत्नी दररोज आंघोळ करत नाही म्हणून पतीने मागितला घटस्फोट

Update: 2021-09-23 04:02 GMT

अलिगढमध्ये एका प्रकरणात पतीने पत्नीपासून घटस्फोट मागितल्याने महिला संरक्षण कक्षात गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. दरम्यान, विभक्त होत असलेलं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र यावे या उद्देशाने पती -पत्नी दोघांनाही कार्यालयात बोलावण्यात आले होते. तेव्हा पतीने पत्नीला घटस्फोट देण्याचे कारण सांगितले, जे ऐकून सगळेच थक्क झाले. कारण, पत्नी आंघोळ करत नाही, म्हणून पतीला घटस्फोट हवा होता.

www.aajtak.in वर दिलेल्या वृत्तानुसार, अलीगढच्या चंडौस पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न दोन वर्षांपूर्वी अलीगढच्या क्वार्सी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुलीशी झाले होते. लग्नानंतर काही काळ सर्वकाही सुरळीत सुरु असताना दोन्ही पती -पत्नीमध्ये एका गोष्टीवरून नेहमीच वाद असायचा.

दोघांमधील वाद एवढ्या विकोपाला गेले की, दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी सहन करणे कठीण झाले. सरतेशेवटी हे प्रकरण जिल्हा मुख्यालयातील महिला संरक्षण कक्षापर्यंत पोहोचले. जिथे समुपदेशनाच्या मदतीने प्रशासनाच्या टीमने पती -पत्नी दोघांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला.

महिला संरक्षण कक्षामध्ये, समुपदेशकाने पती आणि पत्नी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पतीला घटस्फोटाच कारण विचारले तर, पतीने सांगितले की तो आपल्या पत्नीवर नाराज आहे कारण, ती दररोज आंघोळ करत नाही, ज्यामुळे तिच्या शरीरात दुर्गंधी येते. म्हणूनच त्याला यापुढे पत्नीसोबत राहायच नाही. दुसरीकडे, पत्नीच्या बाजूने प्रतिआरोपी करण्यात आला आहे की, निराधार गोष्टींच्या आधारे तिला बळजबरीने पती त्रास देत असतो. आतापर्यंत या प्रकरणावर महिला संरक्षण कक्ष कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही. दोघांनाही समुपदेशनाची पुढील तारीख देण्यात आली आहे. विशेष म्हणजे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या या जोडप्याला 9 महिन्यांचे मूलही आहे.

Tags:    

Similar News