पुण्यातील हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर

Update: 2020-11-06 11:23 GMT

पुणे जिल्ह्यातील हवेली पंचायत समितीच्या महात्मा गांधी हॉलमध्ये झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर यांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्द यादव यांचा 16 विरुध्द 3 अशा मोठ्या फरकाने पराभाव केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळे हवेली पंचायत समितीचे यापुर्वीचे उपसभापती युंगधर उर्फ सनी मोहन काळभोर यांनी एक महिण्यापुर्वी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे उपसभापतीपदाची निवडणुक घेण्यात आली.

हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली. त्यात महाविकास आघाडीच्या वतीने हेमलता बडेकर यांनी तर भाजपातर्फे अनिरुद्ध यादव यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीत दोघांचे अर्ज राहिल्याने, मतदान घेतले गेले. त्यात हेमलता बडेकर यांना सोळा तर अनिरुद्ध यादव यांना तीन मते मिळाल्याने उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी हेमलता बडेकर यांची उपसभापती निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पहिल्यांदाच महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याची पाहायला मिळालं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीनं या निवडणूकीत भाजपला दाखवलं आस्मान दाखवलं, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Tags:    

Similar News