"कर्मचाऱ्यांना रस्त्यात संडासला बसवले आणि स्वतः.." सदावर्तेंच्या आलिशान गाडीवरून नेटकरी भडकले

गुणरत्न सदावर्ते व त्यांचे कुटुंबीय वापरत असलेल्या आलिशान गाडीची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे..

Update: 2022-04-09 14:58 GMT

एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आज या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सर्वत्र ही चर्चा सुरू असताना समाजमाध्यमांवर एका दुसऱ्याच गोष्टीने धुमाकूळ घातला आहे. आता तुम्ही म्हणाल सर्वत्र हेच चालू असताना समाजमाध्यमांवर असं काय वेगळी चर्चा चालू आहे. तर इथे पण वकील गुणरत्न सदावर्ते यांचीच चर्चा आहे पण ती त्यांच्या पोलीस कोठडीची नाही तर ते व त्यांचे कुटुंबीय वापरत असलेल्या त्या आलिशान गाडीची.

आज मुंबई किला कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली. या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील आल्या होत्या त्यावेळी त्या ज्या गाडीतून आल्या त्या आलिशान गाडीची समाजमाध्यमांवर चर्चा आहे. आता या गाडीचा व्हिडीओ पत्रकार रश्मी पुराणिक यांनी शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, " गेले पाच महिने एसटी कर्मचारी बिनपगारी आंदोलन करत आहेत ..घर सोडून रस्त्यावर आले..त्याचे वकील आणि कुटुंबीय ह्या गाडीतून जातात...आज ही कर्मचारी रस्त्यावर वकिलांना पाठिंबा द्यायला..."

आता रश्मी पुराणिक यांनी हा गाडीचा व्हिडिओ ट्विट करताच त्यांच्या या ट्विट वर कॉमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. आता या व्हिडिओवर लोकांनी काय कॉमेंट्स केल्या आहेत पाहुयात..

JR_India या ट्विटर वापरकर्त्याने त्यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हंटल आहे की, या वकीलाच्या नादाने ST कर्मचारी बिचारे 5 महिने उन्हात बसले. 50000 लोकांकडून 600 रुपये म्हणजे जवळपास 3 कोटी जमवले. आझाद मैदानात सोई नाही म्हणुन या वकीलाने या कर्मचारी लोकांना BMC च्या समोर भर दिवसा रस्त्यात संडासाला बसवले....आणी याच्या घरच्या अशा Luxury कार ने फिरतात..

प्रदीप वसंत ढवळे या ट्विटर वापरकर्त्याने रिट्विट करत, हे मविआ चे अपयश आहे. या बाबी कधीच प्रसिद्ध व्हायला हव्या होत्या. मविआ चे सोशल मीडिया द हँडलिंग अतिशय कीव येण्याजोगे आहे. हेच जर उलट असते तर भाजपा it सेल ने ही बाब महाराष्ट्रभर पसरवली असती. ज्याच्याशी लढाई आहे त्याला अजूनही कॅज्युअली घेतात मविआ चे नेते असं म्हटले आहे.

हेमंत धनवडे या ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, हेच साध्य होणार होत...जेव्हा आपण स्वतःच डोकं वापरायचं सोडून मुर्खांच्या नादी लागून धक्क्याला लागतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते... अन् कर्मचाऱ्यांना हे आज नाही पण नंतर नक्कीच कळेल... त्या हरा*खोर सदुल्या चा काहीही दोष नाही त्याच्या मागे उभे राहिलेले मूर्ख होते अन् आहेत...

तर मनोज पवार म्हणतायत की, या माणसाने आम्हाला जगायला शिकवलं..

आशा कॉमेंट रश्मी पुराणिक यांनी केलेल्या ट्विटवर आल्या आहेत..

Tags:    

Similar News