किराणा दुकाणांचीही ठरली वेळ, सरकार घेणार मोठा निर्णय

गृहिणींनो तुमच्या घरात पुरेसा किराणा आहे ना? कारण आता सरकारने 15 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये आणखी एक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणजे किराण्याचं लॉकडाऊन.

Update: 2021-04-19 14:48 GMT



गृहिणींनो तुमच्या घरात पुरेसा किराणा आहे ना? कारण आता सरकारने 15 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये आणखी एक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणजे किराण्याचं लॉकडाऊन. यामध्ये दिवसाला ठरावीक वेळेतच किराणा मिळणार आहे.

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांची संचारबंदी सरकारने लावली आहे. मात्र संचारबंदी असतानाही किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. त्याचबरोबर मास्क न लावताच काही जण विनाकारण बाहेर फिरत आहे.

त्यामुळे किराणा दुकाने सुरु ठेवण्यासाठी सकाळी ७ ते ११ अशी चार तासांचीच वेळ देण्याचा विचार सुरु आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने तसे बदल केले जातील. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

तसेच आज झालेल्या बैठकीत राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. करोनाची साखळी तोडायची असेल तर आपल्याला संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. असं टोपे यांनी म्हटलं आहे.

सध्या राज्यात १५५० मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज उपलब्ध होत आहे. येत्या काही दिवसांत केंद्राच्या माध्यमातूनही आपण १८०० मेट्रिक टनापर्यंत पोहचू. मात्र रुग्णसंख्या अशीच पुढे वाढत गेली तर अडचण निर्माण होवू शकते. त्यामुळे त्यास्थितीत काय करायचे याचाही विचार आम्ही करत आहोत, असे टोपे यांनी सांगितले.

Tags:    

Similar News