ऑस्कर नंतर ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात देखील लता मंगेशकरांना श्रद्धांजली नाही.. #LataMangeshkar

ऑस्कर नंतर ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात देखील लता मंगेशकर यांना श्रद्धांजली नाही; समाजमाध्यमांवर व्यक्त होतं आहे संताप..

Update: 2022-04-04 15:05 GMT

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर, आता ग्रॅमी पुरस्कार 2022 मध्ये देखील भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. मेमोरिअम विभागातील 2022 ग्रॅमीजने ब्रॉडवे संगीतकार स्टीफन सोंधेम, टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, या वर्षी निधन झालेल्या लता मंगेशकर किंवा बप्पी लाहिरी यांचे नाव घेतले नाही. यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यांतच संगीतकार बप्पी लहरी यांचे देखील निधन झाले. आता नुकताच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकर व बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली गेली नाही आणि त्यानंतर आता पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात देखील लता मंगेशकर व बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली नाही. या सोहळ्याच्या शेवटी मागच्या वर्षी निधन झालेल्या अनेक दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र लता मंगेशकर आणि बप्पी लहरी यांना श्रद्धांजली न आल्यानं आता समाज माध्यमांवर जोरदार टीका सुरू आहे

सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप

सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहिले, " तुम्ही मेमोरिअम सेगमेंटमध्ये इतक्या मोठ्या प्रतिष्ठित आणि दिग्गज गायिका #LataMangeshkar, @mangeshkarlata यांना कसे विसरलात?"

तर एका Twitter वालरकर्त्याने ट्विट करत म्हटले आहे ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कार सोहळ्यांमध्ये लता मंगेशकर यांना कसे विसरले? ज्यांनी सात दशकं क्षेत्रांमध्ये काम केलं त्यांना तुम्ही कसे विसरलात?

एका Twitter वापरकर्त्यांने ट्विट करत म्हटले आहे की, अत्यंत लज्जास्पद आहे. ऑस्कर नंतर ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात देखील आपल्या भारताचा गौरव असलेल्या लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही.

#Oscars किंवा #Grammys दोघांच्याही 'इन मेमोरिअम' विभागात #लतामंगेशकर यांची प्रतिमा नव्हती! दुःखी! असं ट्विट रोहित खिलनानी..

'इन मेमोरिअम' विभागात मेलडी क्वीनचा समावेश न केल्याने #लतामंगेशकर यांचे चाहते निराश झाले आहेत. मीरा सोलनिका यांनी असं म्हंटल आहे?

Tags:    

Similar News