लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आनंदाची बातमी, लवकरच वंदे मेट्रो?

Update: 2023-03-16 00:56 GMT

सध्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस ची संपूर्ण देशभर चर्चा आहे. मुंबई-सोलापूर-मुंबई या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस धावण्यास सुरुवात होऊन आता एक महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल या एक्सप्रेसचे लोकार्पण केले होते. आता याच धर्तीवर देशातील प्रमुख शहरांच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाचे आहे. आपण पाहिलं तर गेल्या दशकात रेल्वे प्रवासाचे चित्र हे झपाट्याने बदलत आहे. आता तर वंदे भारत एक्सप्रेस च्या माध्यमातून विमान प्रवासाची अनुभूती देणाऱ्या गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. सध्या देशभरात अशा प्रकारच्या दहा वंदे भारत गाड्या धावत आहेत. वंदे भारत एक्सप्रेसची सर्वत्र चर्चा असताना रेल्वे बोर्ड मुंबईत अशा प्रकारची लोकल ट्रेन सुरू करण्याचा विचार करत असल्याचं समोर आलं आहे. वंदे भारत सारखी लोकल ट्रेन लवकरच धावणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आता मुंबईकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते..

वंदे मेट्रो ट्रेन धावणार?

सर्वत्र अशी चर्चा आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुका पूर्वी मुंबईत वंदे भारत रेल्वे सारखी लोकल धावेल. या संदर्भातील केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी 1 फेब्रुवारी रोजी शहरांतर्गत प्रवासासाठी वंदे मेट्रो संकल्पनेची घोषणा केली होती. त्यामुळे मेड इन इंडिया वंदे मेट्रो ट्रेन यावर्षी डिसेंबर पर्यंत तयार होतील असे देखील म्हटले जात आहे. वंदे लोकल ही वंदे भारत ट्रेन सारखीच किंवा त्याचीच एक छोटी आवृत्ती असेल या माध्यमातून प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येईल. विशेषता मुंबई महानगर प्रदेशात एसी लोकलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर या ठिकाणी वंदे लोकल ट्रेन सुरू करण्याचा सुद्धा विचार होऊ शकतो.

वंदे भारतच्या बरोबरीने वंदे मेट्रो..

मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजनीश गोयल यांनी याबाबत सांगताना माहिती दिली आहे ती अशी की, रेल्वे बोर्ड शहरात वंदे भारत सरकार लोकल गाड्या चालवण्याच्या शक्यतेचा विचार करत आहे. लोकांना आरामदाई प्रवास करता यावा यासाठी आम्ही वंदे भारतच्या बरोबरीने वंदे मेट्रो आणत आहोत. रेल्वेने देशभरातील शहरांतर्गत प्रवाशांसाठी वंदे मेट्रो रॅपिड आणि वंदे मेट्रो प्रादेशिक अशा दोन प्रकारच्या वंदे मेट्रो सेवा ऑफर करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या मुबईकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे..

Tags:    

Similar News