रायगडमधील अतिरिक्त ऑक्सिजन अन्य जिल्ह्यांना द्या: अदिती तटकरेंचं मदतीचं पाऊल

Update: 2021-04-16 07:40 GMT

राज्यात करोनारुग्ण संख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनही लावण्यात आलं आहे. करोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांसोबत ऑक्सिजनचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात भासू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडमधील पेन या ठिकाणी असलेल्या जे. एस. डब्ल्यू. इस्पात कंपनीत ऑक्सिजन वायूची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा पाहता पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगड येथील ऑक्सिजनचा उर्वरित साठा अन्य जिल्ह्यांना उपलब्ध करुन द्यावा तसेच रायगड जिल्ह्यात रेमडिसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपल्ब्ध करुन देण्याची मागणी अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या मागणीप्रमाणे रायगड जिल्हयातील करोनाग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक असणारा "ऑक्सिजन" वायूचा साठा व पुरवठा कायम ठेऊन, राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्य भावनेतून उर्वरित साठा राज्यातील अन्य जिल्हयामध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत अन्न व औषध प्रशासनास आदेश निर्गमित करावेत, यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे.

Tags:    

Similar News