#गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो

आज ट्विटरवर एक हॅशटॅग सर्वाधिक ट्रेन्डिंगमध्ये आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधित या हॅशटॅगमुळे एक महिला शेतकरी नेता चर्चेत आली आहे.

Update: 2020-12-07 11:30 GMT

शेतकरी कृषी आंदोलन तीव्र झाले असताना भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. पण त्याच्या एक दिवसआधी ट्विटरवर एक हॅशटॅग सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. #गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण याचा संबंधही शेतकरी आंदोलनशी आहे.




शेतकरी आंदोलनामध्ये किसान मोर्चाच्या पदाधिकारी गीता भाटी या सहभागी झाल्या आहेत. पण या आंदोलना दरम्यान त्यांच्या पायातील सँडल गायब झाली. त्यानंतर त्यांनी यामागे पोलीस आणि सरकारचा हात असल्याचा आऱोप केला आहे. तसंच सँडल चोरली गेली तरी आपण मागे हटणार नाही आंदोलन करत राहू असे त्यांनी जाहीर केले आहे.



पण त्यानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये गीता भाटी यांची सँडल परत करा अशा आशयाचा मजकूर आहे.


Tags:    

Similar News