ऑनलाइन दारू मागवणं महिलेला पडलं महागात;1 लाख 40 हजार रूपयांचा गंडा...

Update: 2021-10-14 04:29 GMT

सध्या ऑनलाईन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मागील दीड वर्षांच्या काळात ऑनलाईन खरेदीवर लोकांचा जास्त भर दिसून येतोय. प्रत्येक गोष्ट बाहेर बाजारात न जाता ऑनलाइन पद्धतीने घरीच मागून लोक ऑनलाइन शॉपिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना पाहायला मिळतात. ऑनलाइन शॉपिंग किती प्रमाणात सुरक्षित आहे? याबाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे. कारण अनेक वेळा फसव्या कंपनीच्या मार्फत लोकांना लुबाडण्याचे काम मोठ्या प्रमाणात केलं जातंय. आज कुठली गोष्ट ऑनलाईन मिळत नाही असं होत नाही. अगदी मद्य सुद्धा LockDown च्या काळापासून ऑनलाईन पद्धतीने लोकांना घरपोच देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. बऱ्यापैकी शहरातील दारू दुकानदार हे ऑनलाईन ऑर्डर घेतात व घरपोच दारू पुरवतात. Online पद्धतीने Order करण्यासाठी ते लोकांना वेगवेगळ्या ऑफर देखील देतात. जेणेकरून लोक त्यांच्याकडे आकर्षित होतील.

ही ऑनलाईन खरेदी खरंच सुरक्षित आहे का? याबाबत आता पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. कारण अशाच प्रकारे ऑनलाईन Liquor खरेदी करत असताना अलिबाग येथील महिलेची 1 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना आता समोर आली आहे. तक्रारदार महिलेचे लग्न ठरले होते. त्यांचा हळदी समारंभ होणार होता. म्हणून समारंभात येणाऱ्या पाहुण्यांसाठी वाइनची सोय करण्यात येणार होती. त्यासाठी या महिलेने वाइन ऑनलाईन पद्धतीने मागवली. पिके (PK) वाइन्स या ॲपवरून त्यांनी संबंधित व्यक्तीने दिलेल्या Account वर 1 लाख 40 हजार 26 रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठवले. हे सर्व पैसे त्या अज्ञात व्यक्तीच्या अकाउंट वरती भरले मात्र Liauor काय मिळाली नाही. त्या अज्ञात व्यक्तीने पैसे अजून मिळाले नाही असं सांगत इतकी मोठी रक्कम त्या महिलेकडून उजळली. त्यानंतर महिलेच्या आपली फसवणूक झाली असल्याचे लक्ष्यात आल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या विरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी संपूर्ण तपासणी करून नंतरच खरेदी करणं गरजेचं आहे असं आवाहन यावेळी पोलिसांनी केला आहे.

Tags:    

Similar News