अनोख्या रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी सोहळा...

Update: 2022-08-11 07:47 GMT

पारंपरिक पंचारतीसह औक्षण, गोड धोड मिठाईचा आस्वाद आणि स्वत: घडविलेल्या राख्या बांधून आपल्या भाऊरायांना रक्षाबंधनाच्या दिलेल्या शुभेच्छा असा अनोख्या रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी सोहळा आज अमरावतीमध्ये पाहायला मिळाला. रक्षाबंधन दिवशी आपल्या सहाकाऱ्यांना राखी बांधत काँग्रेसच्या नेत्या, आमदार तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.




 


काळ, वेळ, ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, प्रसंगी घरापासून दूर राहून आपल्यासोबत जनसेवेच्या कार्यात स्वतः ला झोकून देणारे, आपली सर्वतोपरी काळजी घेणारे, आपले कार्यालयीन सहकारी हे आपल्यासाठी भाऊरायाच आहेत. रक्षाबंधन म्हणजे बहीण- भावाच्या अतूट नात्याचा आणि विश्वासाचा सण म्हणून सगळीकडे साजरा होत असताना आपल्या परिवारापासून दूर असलेले आपले सहकारी भाऊराया असून त्यासाठी आज रक्षाबंधन निमित्ताने माझ्या या लाडक्या भाऊरायाचं औक्षण केले. त्यांना राखी बांधत रक्षाबंधन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.




 


तसेच ज्यांना बहीण नाही अशा अनेक मंडळींना रक्षाबंधन निमित्ताने तब्बल दिड लाख राख्या खरेदी करून त्या ३३८ गावामध्ये पाठविल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही परंपरा कायम राखल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

Tags:    

Similar News