फुटबॉल सामन्यात पांढरे कार्ड केंव्हा वापरतात ?

Update: 2023-01-25 02:24 GMT

 फुटबॉल सामन्यात ही तीन रंगाची कार्ड वापरली जातात.लाल ,पिवळे आणि पांढरे.पण आजपर्यंत फक्त लाल ,आणि पिवळे कार्ड वापरले जायचे पण पहिल्यांदा पांढरे कार्ड वापरण्यात आले.

तस पाहता ही 1970 च्या विश्वचषक स्पर्धेपासून पंचांनी कार्ड दाखवण्याची प्रथा आहे .फुटबॉलमधील नियमभंगासाठी पंच पिवळे आणि लाल कार्ड वापरतात...पण पोर्तुगालमधील महिला फुटबॉल लीगमध्ये पंचांनी पांढरे कार्ड वापरले आणि पांढरे कार्ड वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पांढऱ्या कार्डचा उद्देश हा आहे...

खेळातील नैतिक मूल्य सुधारावी आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक करत पंच पांढरे कार्ड दाखवतात.फुटबॉलची शिखर संघटना मानल्या जाणाऱ्या "फिफा "नेच पांढरे कार्ड सादर करण्यास सुरुवात केली आहे.

  पोर्तुगालमधील महिला फुटबॉल लीगमध्ये सामन्यादरम्यान स्टेडीयम मधील एका प्रेक्षकाला अस्वस्थ वाटायला लागलं, ताबडतोब वैद्यकीय यंत्रणा सक्रिय झाली .त्या डॉक्टरांच्या कृतीचे कौतुक म्हणून पंचांनी पांढरे कार्ड दाखवले...पण फुटबॉल स्पर्धेत पांढरे कार्ड वापरण्याची ही पहिलीच वेळ होती.

Tags:    

Similar News