टरबुजाला कवडीमोलाचा भाव; शेतकऱ्यांनी टरबूज टाकले जनावरांना..

Update: 2022-05-12 13:07 GMT

सध्या भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आता पिकवलेल्या पिकाचे काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे. आता टरबूज पिकाची देखील तीच अवस्था झाली आहे. टरबुजाला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे. बाजारात जाणारे टरबूज हे जनावरांना घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

टरबुजाला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे. अक्षरशा टरबूज बाजातर विकण्यासाठी नेण्याऐवजी ते जनावरांना खायला टाकण्याची वेळ येवल्यातील सुस्मिता सोनवणे या टरबूज उत्पादक महिला शेतकऱ्यावर आली आहे.

येवल्यातील सुस्मिता सोनवणे या महिला शेतकऱ्याने दीड एकर टरबुजाचे पीक घेतले होते. मात्र पीक निघण्यास सुरुवात झाली असता बाजारात टरबूज विक्रीला आणले असता टरबुजला अत्यंत कमी भाव मिळाला. अक्षरशः 10 रुपयात चार टरबूज विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे टरबूज जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. दीड एकर टरबूज करत असताना जवळपास त्यांना 80 रुपये उत्पादन खर्च आला होता. मात्र उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने जनावरांना टरबूज खाऊ घालण्याची वेळ या शेतकरी महिलेवर आली आहे.

Full View

Tags:    

Similar News