#FarmersProtest: शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींची मोदी सरकारवर आगपाखड...

Update: 2021-01-31 09:00 GMT

शिवसेनेच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींनी मोदी सरकारवर दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून टिका केली आहे. गेल्या ६७ दिवसांपासून दिल्लीत मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांनी तब्बल २३ वेळा केंद्र सरकार सोबत बेठका केल्या. पण या सर्व बैठका निष्फळ ठरल्या.

त्यामुळे शेतकऱ्यांचा राग आनावर झाला आणि देशाच्या प्रजासत्ताक दिनीच २६ जानेवारीला दिल्लीच्या अनेक भागात हिंसाचार उसळला. या हिंसाचारात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दिल्लीतील लाल किल्ला परिसराचं नुकसान केलं. पोलीसांसोबत धक्काबुक्की, लाठी हल्ले आणि दगडफेक केली गेली. पोलीसांनीही शेतकऱ्यांवर प्रतिहल्ले करत अश्रू धुराचे फवारे सोडले, लाठी चार्ज केला, हा सर्व संघर्ष केंद्र सरकारच्या आडमुठे पणा मुळे घडल्याचं म्हणत विरोधकांनी मोदी सरकारवर टिका केली आहे.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी या आंदोलनाबद्दल ट्विट करत 'शेतकऱ्यांना मारलं जात आहे, खऱ्या इमानदार पत्रकारांना तुरूंगात डांबलं जात आहे, खऱ्या आंदोलनकर्त्यांना आंदोलनाचं श्रेय मुद्दाम दिलं जात नाहीये, सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या मोदी सरकारचा माज उच्च शिखरावर आहे, ही लोकशाही नाही तर भाजपची वेडेशाही आहे.' अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Tags:    

Similar News