चित्रा या प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..
अनेक सुपरहिट सिनेमांसोबत शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते...;
80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नलनाई चित्रा यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 56 वर्षांच्या होत्या. मल्याळम आणि तामिळ मध्ये त्यानी अनेक सुपरहिट चित्रपट केले. अट्टकलासम, कमिशनर, पंचगणी, देवासुरम,अमरम, एकलव्य्यान, रुद्राक्ष आणि मिस्टर बटलर आशा गाजलेल्या चित्रपटांबरोबर जवळपास 100 पेक्ष्या जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
तसेच राजिया व एक नई पहेली या दोन हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी भुमीका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच त्या एका मालिकेचे चित्रीकरण करत होत्या. मल्याळम आणि तामिळ या व्यतिरिक्त त्यांनी कन्नड व तेलगू सिनेमात देखील काम केले होते. आज सकाळी चेन्नई या ठिकाणी त्यांचे निधन झाले.