'डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांची त्सुनामी येईल' ; WHO च्या प्रमुखांच्या इशारा

Update: 2021-12-30 06:41 GMT

WHO चे प्रमुख टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom) यांनी जगाला कोरोना महामारीबाबत आता इशारा दिला आहे. 'डेल्टा आणि ओमिक्रॉन (Omicron) प्रकारांची त्सुनामी येईल' असं त्यांनी म्हंटल आहे.

जगाची आरोग्य यंत्रणा आपल्या क्षमतेच्या पलीकडे सध्या काम करत आहे. यानंतर डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन (Omicron) सारख्या दोन्ही धोक्यांमुळे संसर्गाचा आकडा विक्रमी उच्चाकी गाठेल. यामुळे हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचे प्रमाणे वाढेल. एका आठवड्यात जागतिक स्तरावर कोरोना रुग्णांच्या संख्येत 11% वाढ झाली आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, गेल्या आठवड्यात कोरोनाच्या जागतिक प्रकरणांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे. बुधवारी अमेरिका आणि फ्रान्समध्ये दैनंदिन प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. मला Omicron बद्दल खूप काळजी आहे, तो खूप वेगाने पसरतो आणि तो जगभर मोठ्या प्रमाणावर पसरत आहे.

Tags:    

Similar News