राज्यात करोना रुग्णसंख्येत वाढ : ५५ हजार ४११ नवीन रुग्ण...

राज्यात ५५ हजार ४११ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर ५३ हजार ००५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात कोरानाने ३०९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Update: 2021-04-10 17:48 GMT

राज्यात करोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात वाढत्या करोना विषाणूची साखळी मोडणे अत्यंत गरजेचं झाले आहे. करोना नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊनचा अंतिम निर्णय झाला नसला तरी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान आज राज्यात ५५ हजार ४११ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर ५३ हजार ००५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात कोरानाने ३०९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर १.७२% एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१८% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Tags:    

Similar News