कोरोना लसीच्या प्रमाणपत्राबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय...

Update: 2021-11-21 02:28 GMT

कोरोना लसीच्या प्रमाणपतत्राबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता, कोणतीही सेवा देणारी सरकारी किंवा खाजगी कंपनी त्यांच्या ग्राहकांच्या संमतीनंतर CoWIN पोर्टलवरून लसीकरणाची स्थिती जाणून घेऊ शकेल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ट्रॅव्हल एजन्सी, मनोरंजन संस्था IRCTC यांचा समावेश असेल. त्याच वेळी, तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात किंवा अशी कोणतीही कंपनी ज्याला तुमची स्थिती जाणून घ्यायची आहे, ती तुमच्या परवानगीने CoWIN अँप वर हे पाहू शकेल.

काय असणार आहे याची प्रकिया पाहूयात...

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी CoWIN वर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीची लसीकरण स्थिती जाणून घेण्यासाठी, कोणत्याही कंपनीला त्याच्या मोबाइल नंबर किंवा नावासह CoWIN पोर्टल सर्च करावे लागेल. यानंतर संमतीसाठी त्या व्यक्तीच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल. हा क्रमांक सेवा पुरवठादाराला सांगावा लागेल, त्यानंतर लसीकरणाची स्थिती संबंधित कंपनीला कळू शकेल.

यामुळे लसीचे प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल

ज्या नागरिकांकडे लसीचे प्रमाणपत्र डिजिटल किंवा कागदी स्वरूपात उपलब्ध नाही अशा नागरिकांना मदत करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यासह, सेवा पुरवठादार कंपनीच्या संमतीने एखाद्या व्यक्तीच्या लसीकरण पडताळणीचे काम डिजिटल पद्धतीने पूर्ण केले जाईल.

Tags:    

Similar News