रंगीबेरंगी होळी आणि ऐश्वर्या नारकरांचा खास "मखाना चुरमा"!

Update: 2024-03-23 07:12 GMT

दिवाळी असो किंवा होळी हे सन देशभरात एकदम थाटात साजरे केले जातात. त्यात होळीचा उत्साह हवेत दरवळत असताना, अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास पदार्थ बनवला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय! ऐश्वर्या नारकरांनी रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आता तुम्हाला उत्सुकता असेल तो पदार्थ जाणून घेण्याची बरोबर ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यन्त नक्की बघा.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या झी मराठीवरील मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी रूपाली या पात्राची नकारात्मक भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या ही अभिनयासोबतच पाककलेतही तरबेज आहे. ती नेहमी आरोग्यला पोषक अशा रेसिपींचे व्हिडीओ शेअर करत असते.

तिने नुकताच एक पदार्थ बनवला असून ज्याला 'मखाना चुरमा' असं म्हटल जात. मखाना भाजून त्याची पेस्ट बनवून यामध्ये मखाण्यासह सुकामेवा आणि खजुर यांचं मिश्रण करून 'मखाना चुरमा' बनवला जातो. हा पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी आणि बनवण्याची पद्धत ऐश्वर्या यांनी व्हिडीओमध्ये दाखवली आहे. 'मखाना चुरमा' हा पदार्थ आरोग्यासाठी चांगला आणि खाण्यासाठी स्वादिष्ट असा पदार्थ आहे.

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. "खूप सुंदर", "कधी यायचं तुमच्या हातचं खायला", "फिटनेसचं रहस्य आलं समोर", "उत्तम ताई" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत. सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

या होळीला, ऐश्वर्या यांच्या 'मखाना चुरमा'ची रेसिपी वापरून तुम्हीही तुमच्या कुटुंबासाठी हा स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता आणि होळीचा आनंद साजरा करू शकता! ऐश्वर्या नारकरांचा होळीचा आनंद आणि 'मखाना चुरमा'चा स्वाद! तुम्हाला कसा वाटला

Tags:    

Similar News